न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- संगणमत करुन आरोपी महिला व फिर्यादी यांचा मुलगा याचे एकत्रित फोटो असल्याचे सांगत ब्लॅकमेलिंग केले. फिर्यादीच्या मुलाकडून आरोपीने सोने व पैसे घेतले. तसेच मागील काही दिवसांपासुन आरोपी हे पुन्हा पैशाची मागणी करीत होते. पैसे न दिल्यास फिर्यादीच्या मुलाच्या पत्नीस फोटो पाठविणार असल्याची धमकी दिली.
आरोपी महिलेने ते फोटो फिर्यादीच्या मुलाच्या पत्नीस पाठवुन मानसिक त्रास देत फिर्यादीच्या मुलास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. हा प्रकार २०१६ ते २८/१०/२०२२ पर्यंत तुलसी हाईट्स, पाचपीर चौक, काळेवाडी व जितीन भवन, मेडीलाईफ हॉस्पीटल मागे, विजयनगर, काळेवाडी येथे घडला.
फिर्यादी महिला यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















