- शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवकचे आंदोलन; चार हजार पत्र रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध अंदोलन करण्यात आले. माजी अध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत खराळवाडी पोस्ट ऑफिसमध्ये सूमारे चार हजार पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रसाठी नाही तर गुजरातसाठी काम करत आहे. या तीन महिन्यात सुमारे महाराष्ट्रातील युवक युवतींना साडेतीन लाख रोजगार निर्मिती होणारे तीन मोठे प्रकल्प नेमके गुजरात मध्ये का पाठवले जात आहेत.? इतर राज्यात का गेले नाहीत? महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फॉक्सकाँन,बल्क ड्रॅग पार्क व आता टाटा एअरबस हे तिन्ही प्रकल्प गुजरातच्या निवडणुका मोदींनी जिंकण्यासाठी मदत म्हणून महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला स्थलांतरीत करीत आहात.यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबावर बेरोजगारीची वेळ तुम्ही आणली असून,महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करून निष्पाप तरुणांना भोंगे, दहीहंडी, हनुमान चालीसा,दिवे फटाके यामध्ये अडकवून तुम्ही सोयीचे राजकारण करत आहात. संपूर्ण देशाचा पोट भरणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील उद्योगधंदे हे शिंदे फडणवीस सरकार ज्या गतीने गुजरातला पळवत आहे. एक दिवस असा येईल महाराष्ट्रातील तरुणांना युपी बिहारमध्ये नोकरी शोधायला जावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रातील युवकांवर आणली जात आहे.याचा आम्ही निषेध करतो एक स्वाभिमानी नागरिक म्हणून तुम्ही घेतलेल्या या महाराष्ट्रद्रोही भूमिकेचा आम्ही पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून आम्ही निषेध करीत आहोत.
या आंदोलनात माजी नगरसेवक अरुण बोराडे, प्रकाश सोमवंशी, राजू बनसोडे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस तर्फे प्रदेश सचिव डॉ अरुण शिंदे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश बजबळकर,अमोल रावलकर, दिनेश पटेल,राहुल पवार,श्याम जगताप,प्रवीण खरात,दीपक गुप्ता,सागर वाघमारे,साहिल शिंदे, रूबान शेख,रोहित मोरे,सुरज पटेल,पियुष अंकुश,बापू कातळे, युवराज पवार,राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस संगीता कोकणे,मीरा कदम, समिताताई गोरे, दत्तात्रय जगताप,विशाल जाधव,अकबर मुल्ला,कुणाल जगताप,अनिल चव्हाण,इरफानभाई शेख,विकास गाढवे,जितेश पुलवरे, तानाजी जवळकर,सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष समीर थोपटे,मयूर खरात,संकेत जगताप,केतन हुके व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक कार्यकर्ते यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात ” महाराष्ट्राचे गद्दार गुजरातचे वफादार. गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी, गद्दारांना ५० खोके महाराष्ट्राला धोके, द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी ” अशा जोरदार घोषणा दिल्या.


















