न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असताना आरोपीने त्याच्या ताब्यात २०० रूपये किंमतीचा लोखंडी कोयता बाळगला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत कोयता जप्त केला.
पोलिसांनी ही कारवाई (दि. ३०) रोजी ३.१० च्या सुमारास श्री हॉस्पीटल जवळ, रामदास नगर, चिखली येथे केली. शस्त्र विरोधी पथकाचे पो. हवा. चंद्रकांत मोतीराम गवारी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी किरण राजु राठोड (वय २३, रा. रामदासनगर, चिखली) याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.















