न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिचवड महापालिकेच्या विविध विभागासाठी लॉकर आणि थ्री सीटर बेंच खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १२ लाख ६ हजार २९५ इतका खर्च करण्यात आला आहे.
विविध विभागांना लॉकर व इतर साहित्याची गरज होती, त्यानुसार मध्यवर्ती भांडार विभागाने २१ हजार ८७ हजाराची निविदा प्रक्रिया राबविली. त्यासाठी १० निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४ निविदा पात्र ठरल्या, तब्बल ४२.१५ टके कमी दराची सांगवी येथील इंद्रनील टेकॉलॉजीजची निविदा पात्र ठरली आहे.त्याच्याकडून १३ हजार ९५९ दराने १२ लॉकर, ६ हजार ७८५ रूपये दराने थ्री सीटर बेंच आणि ४ हजार ९५९ रूपये दराने हॉस्पिटल बेंच खरेदी करण्यात आले आहेत.
विविध विभागांसाठी फाइल्स, इतर आवश्यक कागदपत्र ठेवण्यासाठी लहान आकाराची लोखंडी ८७ कपाटे व ७० बुककेस खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी १३ लाख ३९ हजार इतका खर्च करण्यात आला आहे.
















