न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- कोथिंबीर घेऊन नाशिक हायवेने पुण्याकडे येत असताना फिर्यादीच्या बोलेरो पिकअप गाडीला (नंबर एम एच १५ डीके २१९८) पाठीमागून चाकणच्या दिशेने येणाऱ्या चौघांनी स्कूटी आडवी घातली. ” तू आम्हाला कट का मारला ” असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करुन गाडीमधून खाली ओढले. त्यांना हाताने मारहाण करीत त्यांच्या बोलेरो पिकअप गाडीवर जबरदस्तीने ताबा घेतला.
आरोपींनी फिर्यादीला स्कुटीवर बसवून नेले. फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम ३००० रुपये, नाशिक आरटीओचे लायसन व १०,००० रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण किंमत रुपये ६,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत फिर्यादीला आरोपींनी हाताने मारहाण करीत अंगावरील कपडे काढून तेथेच सोडून निघून गेले.
हा प्रकार (दि.३१/१०/२०२२) रोजी रात्री १२.२० वा. कुरूळी गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेवर, आळंदी फाटयाचे पुढे, माय कार शोरूमच्या जवळ घडली. फिर्यादी अतिश अनिल शेळके (वय २१ वर्षे, रा. कासारवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी संदीप दिलीप बोडके (वय २५ वर्षे), संतोष राम किसन सुर्यवंशी (वय २२ वर्षे), दोन अनोळखी इसम (वय अंदाजे वय २४ ते २६ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.