- काळेवाडीतील घटना; आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- मुलींसह घरात टि.व्ही. पाहत असताना फिर्यादी महिलेच्या ओळखीच्या आरोपीसह त्याच्या पाच ते सहा महीला साथीदार अचानक फिर्यादीच्या घरात घुसल्या. त्यांनी बेकायदेशिर जमाव जमवुन फिर्यादी व त्यांच्या मुलींना शिवीगाळ व मारहाण करीत फिर्यादीला घराबाहेर काढले. फिर्यादीच्या ओळखीच्या आरोपीने फिर्यादी यांची गचंडी धरून फिर्यादीला दोन वेळा जोरात चापट मारली.
फिर्यादीच्या अंगावरचे कपडे फाडले. त्यांच्या छातीवर व मानेवर नखाने ओरखडे काढीत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कत्य करुन त्यांना ढकलुन दिले. तसेच आरोपीच्या सांगण्यावरुन त्याच्या दोन साथिदारांनी जेसीबीच्या सहाय्याने फिर्यादीचे राहते पत्राचे शेड पाडले. घराचे व घरातील सामानाची तोडफोड करुन दोन लाख रुपयांचे नुकसान केले. ही घटना (दि. ३१/१०/२०२२) रोजी दुपारी १.३० वा. सुमारास भारत कॉलनी, नढेनगर, काळेवाडी येथे घडला.
फिर्यादी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून पोलिसांनी आरोपी महेश नढे (रा. नढेनगर, काळेवाडी), जेसीबी वरील महेश नढे याचे दोन साथिदार, यादव नावाची महीला, इतर अनोळखी पाच महीला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.