न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीच्या डोक्यात, कानाच्या पाठिमागे, हातावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोंखडी कोयत्याने हल्ला करीत मारहाण केली.
ही घटना (दि. ४) रोजी २:३० च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी, सेनेट्री चाळ, भिमनगर, भाजी मंडईजवळ, पिंपरी येथे घडली. २४ वर्षीय महिला फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी लड्या उर्फ हर्ष अमर बहोत (वय १९ वर्षे, रा सेनेट्री चाळ, भिमनगर भाजी मंडईजवळ, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.