- भर रस्त्यात अडवून व्यवसायिकाला बिअर, स्प्राईडच्या बाटल्यांनी बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- वासुली फाटा येथील चिकण सेंटरकडे फिर्यादी व कामगार बजाज पल्सर (एम एच १४ सी एच ८३३०) दुचाकीवरून जात असताना रस्त्यात मध्येच आरोपींनी त्यांची गाडी अडवली.
आरोपींनी त्यांच्याकडे चिकण दुकाण चालु ठेवण्यासाठी हप्ता मागितला. फिर्यादीला अमोल चायनिजमध्ये नेऊन आरोपींनी लाथाबुक्याने व बिअर, स्प्राईडच्या बाटल्यांनी डोक्यात, हातावर पाठीत मारून गंभीर जखमी केले.
हा प्रकार (दि. ३) रोजी चार वाजेच्या सुमारास शेलुते, वासोली फाटा रस्त्यावरील अमोल चायनीज सेंटरसमोर भांबोली, ता. खेड येथे घडला. फिर्यादी आरबाज वजलु कमर अन्सारी (वय २२ वर्ष, रा. शेलु ता खेड जि पुणे) यांनी चाकण (म्हाळुंगे चौकी) येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी महेश नाईकरे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), त्याचे इतर चार अनोळखी इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चाकण (म्हाळुंगे चौकी) पोलीस पुढील तपास करीत आहेत.