- आरोपीला पोलिसांकडून अटक; थेरगावातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- मुले आणि व इतर मुलीसह फिर्यादी यांची मुलगी (वय ७ वर्ष ६ महिने) खेळत असताना आरोपीने इतर मुलांना हाकलून दिले. फिर्यादी यांच्या मुलीला फरसाण खायला देत तिच्याशी अशील कृत्य करीत फिर्यादीच्या मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न केली.
ही घटना (दि. ३) रोजी १२.३० ते १.३० च्या सुमारास विष्णुदेव नगर सोसायटी, सर्वे नं २०९, काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली. ३८ वर्षीय महिला फिर्यादी यांनी वाकड पोलीसात फिर्याद दिली आहे.
आरोपी भाउसाहेब माणिकराव गायकवाड (वय ५० वर्षे, रा. बापुजीबुवानगर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करीत पोलिसाने त्याला ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.