न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- देहू नगरपंचायत हद्दीतील सर्व पथविक्रेता, फेरीवाले यांना देहू नगरपंचायतीच्या वतीने मोफत विक्री प्रमाणपत्र आणि मोफत ओळखपत्र मिळणार आहे. त्यासाठी पथविक्रत्यांनी नोंद करण्याचे आवाहन केले आहे.
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत देह् नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सर्व पथविक्रेत्याचे मोबाईल अपद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यांना मोफत विक्री प्रमाणपत्र आणि मोफत ओळखपत्र देण्यात येणार आहे.
देहू परिसरातील सर्व पथविक्रेता, पथारीधारकांचा देहू नगरपंचायतीमार्फत सर्वे करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून नियुक्त केलेले सर्व्हेअर पथारीधारकांपर्यंत पोहोचणार आहेत. नियुक्त कर्मचारी पथारीधारकांजवळ येवून नोंदणी करणार आहे. ही नोंद करताना स्वतःचा आधार कार्ड, रेशनकार्ड आणि आधारकार्डला लिंक करण्यात आलेला मोबाईल स्वतः सोबत ठेवावे. नोंदणी झालेल्या सर्व पथविक्रेत्यांना मोफत विक्री प्रमाणपत्र आणि मोफत ओळखपत्र दिले जाणार आहे. या कामासाठी नगरपंचायत मार्फत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. याची नागरिकांनी दखल घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.


















