- महत्वाची कागदपत्र आणि तीन लाखांच्या मुद्देमालासह केला पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- रियल इस्टेट खरेदी विक्री ऑफीसचे शटर उचकटुन चोरटे आत घुसले. आतील काचेच्या दरवाज्याची काच फोडली. ड्रावरचा दरवाज तोडुन नुकसान केले.
२,५०,००० रु. किं. ची ५ तोळे वजनाची सोन्याची गणपतीची मुर्ती, ६०,००० रु. किं.चे ५०० गॅम वजनाचे चांदीचे दोन हात्ती, ३०००० रु. किं.चे एचडीएफसी बँकेचे व एक आय सी आय बँकेचे चेक बुक, त्यांचे काही चेकवर सहया केलेल्या व काही कोरेचेक असलेले, हिशोबाच्या वहया असणारी लेदर बॅग, मेन सर्व्हरचे हार्ड डिस्क, बँकांची स्वाक्ष-या झालेली कागदपत्रे व एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेच्या स्लीपा वगैरे, सी.सी.टी.व्ही. कॅमे-याचे डी व्ही आर, ८०० रु. किं चेइटरनेट कॅमेराच्या डी.व्ही.आर, मिळकतीच्या खरेदी सबंधीची महत्वाची कागदपत्रे, आणि ५,००० रु. रोख रक्कम असा एकुण ३,१५,००० रु. किं चा मुददेमाल घरफोडी करून चोरी करुन नेला आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी ८.३० वा. ते (दि. ५) रोजी ७.०० वा. चे दरम्यान चिखली अंगणवाडी चौका जवळील ओमसाई मेडीकलचे शेजारील रियल इस्टेट खरेदी विक्रीचे ऑफीस येथे घडला. फिर्यादी शिवलींग वसंत जरे (वय ४० वर्षे, रा. मनिषा हॉसींग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















