न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- किराणा मालाच्या दुकानात येऊन आरोपी फिर्यादीला म्हणाला, ‘ मला एक सिगारेट दया ‘, त्यावर फिर्यादीने, ‘ इथे सिगारेट भेटत नाही ‘, असे सांगितले.
या गोष्टीचा राग मनात धरून त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून दुकानाच्या काऊंटरवरील तराजू काटयावरील स्टीलच्या भांडयाने फिर्यादीच्या डोक्यात मारुन दुखापत केली. हा प्रकार (दि. ५) रोजी रात्री ८:३० वा.चे सुमारास शुभम प्रोव्हीजन स्टोअर, पाचाणे, ता. मावळ येथे घडला.
फिर्यादी शंकर नारायण येवले (वय ९० वर्षे, रा. एल. एम. रेस्टोरंट, पाचाणे, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी सुरज लहू जोरी (वय २७ वर्षे, रा. महागाव, सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.















