न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- गुडवीन सिटी जमिन खरेदी विक्रीचे मालक आरोपीने फिर्यादी यांना गट क्र.४८५ मधील २४०० स्क्वेअर फुट जागा त्याच्या मालकीची असल्याचे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना जागा देण्याचे ठरवुन त्यासाठी फिर्यादीकडुन वेळोवेळी ७,३९,९९९ रूपये घेवून फसवणूक केली. त्यांचे पैसेही परत केले नाहीत. जमिनीचे खरेदी खतही करून दिले नाही किंवा रजिस्ट्रेशनही केलेले नाही. तसेच फिर्यादी यांनी आरोपींना (दि. ०८/१०/२०२०) रोजी मेलव्दारे व लेखी पत्राव्दारे जमिनी खरेदी करायची नसुन व्यवहार रद्द करण्बायाबत कळविले. तसेच फिर्यादी यांच्यासारखे आरोपीने इतर लोकांनाही जागा देण्याचे आश्वासन देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन त्यांनाही जागा न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली आहे.
ही घटना २०१६ पासुन ते ५/११/२०२२ रोजीपर्यंत गुडवीन सिटी लॅन्डमार्क डेव्हलपर्स प्रा.लि.चे ऑफिस, विजय सेंटर, निअर युको बँक, खराळवाडी, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी शिरीष शिवाजी रेडकर (वय ३६ वर्ष, रा. फ्लॅट नं. ए २०२, सिताई व्हिला, स.नं. ४४३/ माण, हिंजवडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी पुर्णचंद्र सनातन स्वाईन (वय ३६ वर्ष, रा. अशोकनगर बिल्डींग नं. २ आर. बी. ३५ लिंकरोड पिंपरी, ऑफिस गुडवीन सिटी लॅन्डमार्क डेव्हलपर्स प्रा.लि. विजय सेंटर, निअर युको बैंक, खराळवाडी, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.















