न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- मुलाच्या बेडरूममधील बॅगेतील हॉस्पीटलची कॅश ३०,००० रुपयांची फिर्यादीचा नोकर आरोपी याने चोरी केली. जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ रोजी वेळोवेळी ५०,००० रु. रोख व ३०,००० रुपये किंमतीचे मनगटी घडयाळ असे एकुण १. १०,००० रुपये मुद्देमालाची चोरी केली असल्याचा फिर्यादीला संशय आहे.
हा प्रकार (दि. ५) रोजी रात्री २३:३० वा. सुमारास व जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान प्लॉट क्रमांक २१२, सेक्टर २१, यमुनानगर, निगडी येथे घडला. फिर्यादी उदय मुरारराव शिंदे (वय ६३ वर्षे, रा. प्लॉट क्रमांक २१२, सेक्टर २१, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी बसवराज अरुण सुतार (वय २०, रा लेन क्रमांक ३, नवरत्न सोसयटी, वडगाव शेरी, पुणे) याला अटक केली आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहे.















