न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- ज्युपीटर स्कुटी गाडी (एमएच १२ पीपी ०१५३) वरून पाठीमागे एकाला बसवुन फिर्यादीचा भाऊ आंबेठाण चौक, चाकण ते आंबेठाण गावाकडे जात होते. दरम्यान पाठीमागुन येणाऱ्या ट्रकच्या (एम एच -४६-ए आर – ७५४३) आरोपी चालकाने ट्रक बेदरकारपणे भरधाव वेगात चालवुन स्कुटीला पाठीमागुन धडक दिली.
त्यात नंदकुमार विष्णू पडवळ (वय ४२ वर्षे) या फिर्यादीच्या भावास डोक्यास गंभीर दुखापत होऊन अपघातात मृत्यू झाला. तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही पायाला किरकोळ व गंभीर दुखापत झाली. स्कुटीचे नुकसान झाले. ही घटना (दि. ५) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास सुरेश भाऊ गोरे यांच्या शिवसेना कार्यालयासमोर, चाकण येथे घडला.
फिर्यादी बारकू विष्णु पडवळ (वय ३६ वर्षे, रा सध्या हरीओम रेसिडेन्सी आंबेठाण रोड चाकण ता खेड, मुळ रा. बोरदरा, ता. खेड जि पुणे) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी नाझीबुल रहमअली इस्लाम (वय २४ वर्ष, रा. मुरामारा, पोस्ट बोरपटा, आसाम) याला पोलिसांनी अटक केली आहे.















