न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपआयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या स्मिता झगडे यांच्या रजा कालावधीत त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर विभागाचे अतिरिक्त कामकाज करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्यावर सोपविण्यात आले आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेने सामान्य प्रशासन विभागामार्फत उपआयुक्त विठ्ठल जोशी यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उपआयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या स्मिता झगडे यांनी दि. १ नोव्हेंबर २०२२ ते १६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रजेवर असल्याबाबत कळविले आहे. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने या कालावधीत त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक होते.
या कालावधीत सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्यावर करसंकलन विभागाच्या कामकाजासह स्थानिक संस्था कर विभागाचे अतिरिक्त कामकाज सोपविण्यात आले आहे, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी दि.७ नोव्हेंबर २०२२ पासून करण्यात येणार आहे.















