न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी बुधवारी (दि. ९) निवडणूक होणार आहे. असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी अॅड. रामराजे भोसले, अॅड. नारायण रसाळ, अॅड. पांडुरंग शिनगारे असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.
कार्यकारिणीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार इच्छुक आहेत. खजिनदार पदासाठी अॅड. विश्वेश्वर काळजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ९ तारखेला सकाळी १० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. तर सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी मतदानाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
विविध जागांसाठी लढत…
उपाध्यक्ष पदासाठी अॅड. कांता गोरडे, अॅड. जयश्री कुटे, अॅड. प्रताप साबळे तर, सचिव पदासाठी अॅड.हरिश भोसुरे, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. गणेश शिंदे हे इच्छुक आहेत. महिला सचिव पदाच्या एका जागेसाठी अॅड.प्रमिला गाडे, अॅड. सोनाली घाडगे, अॅड. रिना मगदूम आणि अॅड. मोनिका सचवाणी यांच्यात लढत होणार आहे.
सहसचिव पदासाठी अॅड. नीलेश जाधव आणि अॅड. मंगेश नढे यांच्यामध्ये तर, हिशोब तपासणीस पदासाठी अॅड. सारिका रणदिवे आणि अॅड.राजेश रणपिसे यांच्यात थेट लढत होणार आहे. सदस्य पदासाठी अॅड. प्रशांत बुचुटे, अॅड. पवन गायकवाड, अॅड. सौरभ जगताप, अॅड. अक्षय केदार, अॅड. धीरज कुचेरिया, अॅड. नितीन पवार, अॅड. राजेश राजपुरोहित, अॅड. स्वप्निल वाळुंज यांचा त्यामध्ये समावेश आहे.















