न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- देवदर्शनासाठी शनीशिंगणापुर येथे फिर्यादी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने फ्लॅटचा दरवाजाचा कोयंडा कट केला. घरात प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये लोखंडी कपाटातील लॉकर उचकटुन लॉकरमधील एकुण २० तोळे वजनाचे ६,९९,५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व दिड किलो वजनाचे चांदिचे दागिने असा ७,८९,५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने व चांदीच्या वस्तु चोरून नेल्या.
हा प्रकार (दि. ५) रोजी ९.१५ वा ते (दि. ७) रोजी १.१५ वा चे दरम्यान शारदा कॉलनी, कस्तुर कुंज सोसायटी, फ्लॅट नं १३, पिंपळे निलख येथे घडला. फिर्यादी रोहीत जगदिश पंचवाघ (वय ३३ वर्षे, रा. शारदा कॉलनी,कस्तुर कुंज सोसायटी, फ्लॅट नं १३, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहे.















