न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :-फिर्यादी रूमवर असताना फिर्यादीच्या मैत्रिणीने फोन केला. त्यांना बँडमेंटन हॉल, वल्लभनगर येथे जायच होते. फिर्यादी तेथे गेले असता तिथे आरोपी उभा होता. फिर्यादी त्यास तु कल्याणी हिला का शिवीगाळ करत आहेत? असे म्हणाले.
आरोपीने तु कोण मला विचारणारी म्हणुन फिर्यादीस वाईट वाईट शिवीगाळ केली. फिर्यादीने त्यास तु शिविगाळ करु नकोस असे सांगितले असता त्याने हातात दगड घेवुन फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूस मारले व उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारी असेलेल्या तीन बोटाला दाताने चावा घेतला. फिर्यादीने आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी तेथुन निघुन गेला.
फिर्यादी कृष्णा धोंडीराम शिंदे (वय २५ वर्षे, रा संत तुकारानगर, पोलीस चौकीच्या पाठिमागे, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी सुरज शंकर गायकवाड (वय २५, रा सुसगाव, ता मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















