न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२२) :- पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी आणि एक अनोळखी महिला आरोपी यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. आरोपीने हातातील लोखंडी कोयता हवेमध्ये फिरवून दहशत निर्माण केली. फिर्यादीच्या घरासमोरील गाडीवर कोयता मारल्याने घराचा दरवाजा उघडला असता फिर्यादीवर जिवे मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार केला.
त्यावेळी वार चुकवून फिर्यादीने घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे येत असताना आरोपी आणि सोबत आलेली महिला आरोपी यांनी फिर्यादीस माझ्या मुलाची तक्रार दिली तर तुम्हाला बघून घेईल अशी धमकी देत हाताने मारहाण केली. हा प्रकार (दि. ७) रोजी १.०० वा. चे सुमारास सम्राट अशोक हौ. सोसा. बी.न.२३/ए से.न.२२ ओटास्किम, निगडी येथे घडला. २८ वर्षीय महीला फिर्यादी यांनी निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपी सॅमसन रॉबर्ड जॉन (वय २५ वर्षे), सुरज वाघमारे (वय २२ वर्षे), रफिक शेख (वय २० वर्षे), सलमोन रॉबर्ड जॉन (वय ३० वर्षे), महीला आरोपी (वय १९ वर्षे), सर्व रा. ओटास्किम निगडी व १ अनोळखी महिला (नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करीत दोघांना ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















