न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- टॉयाटो इटीवॉस कार (एम एच १४ एफसी ०१५१) ही भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी फिर्यादीने आरोपीकडे मागितली. गाडीचे भाडे प्रतिमहिना २० हजार रुपये देतो, असे आरोपीने फिर्यादीला सांगीतले. फिर्यादीने विश्वास ठेवला. तीन महिने आरोपीने फिर्यादीला गाडीच्या भाडयाचे पैसे दिले. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये आरोपी राहण्यासाठी दुसरीकडे गेला. सोबत फिर्यादीची कार नेली. सप्टेंबर, ऑक्टोबर दोन महिने फिर्यादीला आरोपीने गाडी भाडयाचे पैसे दिले नाहीत.
गाडीचे हप्ते थकले. फिर्यादीने आरोपीला फोन केला; परंतु तो फोन केल्यावर वारंवार पैसे देतो असे सांगत होता. त्यानंतर आरोपीने फोन बंद करुन ठेवला. फिर्यादीला कारचे भाडे न देता फिर्यादीची कार परस्पर कोणाला तरी देवुन त्याची विल्हेवाट लावली. फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणुक केली.
ही घटना (दि. २०/२/२०२२) रोजीपासुन ते आजपर्यंत तुलीप होम सोसायटी, मेदनकरवाडी येथे घडला. ३४ वर्षीय फिर्यादी महीलेने चाकण पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी किसन आनंदराव हांबरडे (मुळ रा. ३, हुसा, ता. नायगाव, जि. नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















