न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- दुचाकीस्वाराने मोटर सायकल भरधाव वेगाने चालवली. गाडी नियंत्रित न झाल्याने रस्त्याच्या बाजुच्या झुडपांत धडकुन जखमी झाला. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना (दि. ७) रोजी रात्री ९.१५ वा. च्या दरम्यान सीआरपीएफ गेट जवळ, निलया अपार्टमेंट समोर, मुंबई-पुणे हायवे, तळेगाव दाभाडे येथे घडली. फिर्यादी श्यामलाल बासुदेव गुंजु (वय २५ वर्ष, रा. उर्से, ता. मावळ, मुळ पत्ता. सिंचोरशहा, आसाम, बास्नभारा यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी मोटार सायकल (एमएच १४ जेटी ८१०२) वरिल दुचाकीचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.