न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- मोटर सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे १२ ग्रॅमचे वजनाचे ५५,००० रू किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच श्रीमती पूर्वा कुलकर्णी (वय ५८ वर्षे रा. सेक्टर २९ निगडी) यांचे ४५,००० रू किंमतीचे एक तोळयाचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन नेले.
हा प्रकार (दि. ८) रोजी सायंकाळी ७.१५ वाचे सुमारास, जाधववस्तीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणा-या रस्त्यावर, रावेत तसेच गणेश तलाव ते परमार सोसायटीमधील ओम सुपर मार्केट समोर घडली. २९ वर्षीय फिर्यादी महीलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.