न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील ५३ हजार व्यापाऱ्यांना महापालिकेच्या एलबीटी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. तसेच, थकबाकीदार व विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
पालिकेने एक एप्रिल २०१३ पासून एलबीटी कर वसुली सुरू केली आहे. तीस जून २०१७ ला एलबीटी रद्द करण्यात आला. एलबीटीसाठी शहरातील ३५ हजार ८९२ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील केवळ २० हजार २३३ जणांनी एलबीटी कर भरला आहे. थकीत कर भरण्याबाबत संबंधित व्यापाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले आहे. त्यातील केवळ १० टक्के व्यापाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. पाच हजार २३८ जणांना अंतिम कर भरण्याचा आदेश दिला आहे.
राज्य सरकार जोपर्यंत एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेत नाही. तोपर्यंत व्यापाऱ्यांना एलबीटी भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार पालिका एलबीटी वसुली करत आहे.