न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ नोव्हेंबर २०२२) :- फस्ट लुक मेंन्स वेअर या बंद कपडे विक्रीच्या दुकानाचे लोखंडी शटर अज्ञातांनी उचकटवले. दुकानात प्रवेश करुन दुकानातील १८५ शर्ट, २६५ जीन्स पॅन्ट व हुडीज असे एकुण ९४,४५० रूपये किंमतीचे कपडे चोरी करुन नेले आहेत.
ही घटना (दि. ६) रोजी दहा वा. ते (दि. ७) रोजी ९. ०० वा. सुमारास रामनगर, चिंचवड येथील कपडे विक्रीच्या दुकानात घडली. फिर्यादी नितिन शंकर दातीर (वय ३३ वर्षे, रा. घर क्रं. ११९९, ढोरे फ्लोअर मिलजवळ, एक्साईड बॅटरी कंपनी रोड, विद्यानगर, चिंचवड, मुळगांव मु. पो. गणेशवाडी, ता. कर्जत जि. अहमदनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.