न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- मित्राच्या पोळी भाजी केंद्रासमोर फिर्यादी उभे होते. त्यावेळी आरोपी फिर्यादीकडे रागाने बघत होता. फिर्यादीने आरोपीकडे माझ्याकडे रागाने का बघतो? असे विचारले.
त्यावेळी आरोपीने ‘ तु मला कोण विचारणार माझ्या नादी लागलास तर तुला खल्लास करुन टाकीन ‘ असे बोलुन आरोपीने कमरेच्या मागे लपवुन ठेवलेला कोयता बाहेर काढला. फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजुस व पाठीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.
ही घटना (दि. ८) रोजी ७. ०० वाजता ओंकार पोळी भाजी केंद्र, विनायकनगर, नवी सांगवी येथे घडली. फिर्यादी प्रणित लक्ष्मण जाधव (वय २३ वर्षे, रा. साई सिध्दी अपार्टमेंट, फ्लॅट नं. ५, काटेपुरम चौक नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पियुष विजय शेळके (वय २० वर्षे, रा विनायक नगर, लेन नं १, पिंपळे गुरव, नवी सांगवी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
















