- माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांची पोलीस आयुक्तांकडे धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगर, दत्तनगर, विद्यानगर व मोरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे.
दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील चैन चोरणे , घरफोडी करणे, शिवाय शाळा-कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणारे तरुण दुचाकीवरून जोरजोरात हॉर्न देऊन गाडी चालवतात. सायलेन्सरमधून आवाज काढतात. त्यामुळे सामजिक शांतात बिघडत आहे.
याबाबत माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. यावेळी नंदा करे, उषा सरोदे व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी परिसरात पोलीस गस्त वाढविण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याबद्दल अनुराधा गोरखे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहेत.
















