न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- स्वतःच्या आठ वर्षीय मुलीला आरोपीने भाडयाची रुम पाहण्यासाठी नेण्याचे कारण सांगून व चॉकलेटचे आमिष दाखवत बरोबर नेले. मुलीसोबत आरोपीने अश्लील कृत्य केले.
हा प्रकार (दि. ५ जुन २०२०) सायंकाळी ४.०० ते ६.०० वा. पीठाची गिरणी जवळील भाडयाची रुम, काशीद पार्क, पिंपळे गुरव येथे घडला. ३५ वर्षीय फिर्यादी महीलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी संदीप शशीकांत भिंगारदिवे (वय ३७ वर्षे, रा. विटा ता. खानापुर जि. सांगली) याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















