न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- डयुटीकरीता बसने कामावर जाण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा घरातुन पायी चालत जात होता. त्यावेळी तेथे चार अनोळखी इसम उभे होते. त्यातील एकाने त्याला थांबवले. त्याच्या पेंट व शर्टाचे खिशे चेक करत त्याला ” तुझ्याजवळ किती पैसे आहे ते मला दे ” असे म्हणाले. त्यावेळी त्याने त्यांना “माझ्याजवळ पैसे नाहीत” असे सांगितले.
आरोपींनी त्याला वाईट शिवीगाळ करुन ‘ तुला मारुन टाकेन ‘ अशी धमकी दिली. तसेच “मग तुझ्याजवळचा मोबाईल दे” असे आरोपी त्याला म्हणाले. ” माझेकडे मोबाईल नाही” असे म्हणाला असता त्या अनोळखी इसमांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेले तीन साथिदारांना बोलावुन घेतले चौघांनी मिळुन त्याला परत पैश्याची मागणी केली. ” माझ्याकडे पैसे नाही” असे म्हणताच त्यापैकी तिन इसमानी त्यास पकडुन ठेवले व त्यास आडविणा-या इसमाने चिडुन जावुन त्यांच्या हातामधील तुटलेल्या काचेच्या बाटलीने फिर्यादीच्या मुलाच्या पोटात व पाठीत मारुन गंभीर जखमी केले. त्या तिघापैकी एका इसामाने रस्त्यावरील सिमेंटचा ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
हा प्रकार (दि. ७) रोजी १०.४५ रोजी आंगणवाडी रोड, रुतुजा इंटरप्रायझेस दुकानासमोर, मोरेवस्ती, चिखली येथे घडला. फिर्यादी तुळशीराम भार्गव जाधव (वय ५० वर्ष, रा. सी/ओ. नागेश जाधव, सहयोग कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, मोरेवस्ती, चिखली, मुळ पत्ता मु. पो. कमलनीखुर्द, ता. खेड, जि. रत्नागिरी) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चार इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















