न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- शासनाने बंदी घातलेल्या प्रतिबंधीत अन्नपदार्थाची विक्री करण्यासाठी आरोपीने साठा केला. अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून आरोपीकडून ७४०० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, तंबाखु आदीचा साठा जप्त केला.
ही कारवाई (दि. ९) रोजी १२.२० वा.चे सुमारास सुंदर कॉलनी, पवारनगर, थेरगाव येथे आरोपीच्या घरी केली. फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी शरणप्पा विठ्ठलराव बेलुरे (वय ५३ वर्षे रा. सुंदर कॉलनी, पवारनगर थेरगाव) याला अटक केली आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















