न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- घरातील किचनच्या खिडकीची काच अज्ञात चोरटयाने तोडुन लोखंडी ग्रिल उचकटुन आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाटातील ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपये रोख रक्कम असा एकुण ५,००,००० रुपये किंमतीचा माल घरफोडी करुन चोरी करुन नेला आहे.
ही घटना (दि. ६) रोजी सकाळी ८. ०० वा. ते (दि. ८) रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जागृती निवास, आल्हाट वस्ती, विनोदेनगर, मायक्रो पोलीस २, वाकड येथे घडली.
फिर्यादी रणजित बाळासाहेब आल्हाट (वय ३४ वर्ष, रा. जागृती निवास, आल्हाट वस्ती, विनोदेनगर मायक्रो पोलीस २, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















