न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- महींद्रा पिकअप (एम.एच.१४.ई.एम.१३६६) आणि टाटा मोटर्स कंपनीची बस (एम.एच.१४. सीडब्लु ४४३५) यावरील वाहनचालकांनी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवली. त्यामुळे रस्त्याने जाणा-या इतर लोकांना धोका पोहचू शकत होता.
ही घटना (दि. ९) रोजी अनुक्रमे दुपारी चार आणि पाच वाजता कुदळवाडी मेन ब्रिजवर, स्पाईन रोड, चिखली येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष बांगर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार वाहनचालक आरोपी अतुल बप्पासाहेब कुटे (वय २३ वर्ष, रा. दत्त कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी, मुळगांव मु.पो. वडगांव ता. गेवराई जि. बीड) आणि सुरेश हनुमंत कलवले (वय २८ वर्ष, रा. मु.पो. सेक्टर नंबर १, प्लॉट नंबर २९१, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.















