न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे. पाईप जोडणीचे काम शुक्रवार (दि. ११) रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ७ पर्यंत संपण्याची शक्यता आहे.
यामुळे महापालिकेच्या क, इ आणि फ प्रभागातील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डूडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर १२ यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात शुक्रवारी सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
त्यानंतर रात्रीचा व दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने व विस्कळीत राहील. नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.