न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित १२ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” हिवाळी क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर सुरुवात झाली.
स्पर्धेचे उदघाटन नूऱ्या बिझनेस अँड बँकवेट हॉटेल्सचे सीईओ प्रकाश मेनन ह्यांच्या हस्ते पार पडले, ह्या प्रसंगी अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, भूषण सुर्यवंशी आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते. स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथील अकॅडमीच्या मैदानावर होणार आहेत.