न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनची २०२२-२३ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यासाठी बुधवारी (दि. ९) निवडणूक पार पडली. निवडणुकीमध्ये ६२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. नारायण रसाळ यांची निवड झाली. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन कामकाज शांततेत पार पडली.
निवडीनंतर अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ म्हणाले, न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये लवकरच स्थलांतर करून प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. वकील वर्गाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. वकिलांसाठी कायमस्वरूपी आर्थिक करण्याचे नियोजन केले जाईल.
निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अॅड. नारायण रसाळ, उपाध्यक्षपदी अॅड. जयश्री कुटे, सचिवपदी अॅड. गणेश शिंदे, महिला सचिवपदी अॅड. प्रमिला गार्ड, सहसचिवपदी अॅड. मंगेश मच्छिद्र नढे, खजिनदारपदी अॅड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटरपदी अॅड. रमेश रणपिसे, सदस्यपदी अॅड. स्वप्नील वाळुंज, अॅड. अक्षय केदार, ॲड. सौरभ जगताप, अॅड. नितीन पवार, अॅड. पवन गायकवाड, ॲड. बचुटे यांची निवड झाली.
















