न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- स्पा सेंटरच्या नावाखाली आरोपींनी तीन पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. वेश्याव्यवसायासाठी त्यांना प्रवृत्त करुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
पोलिसांनी (दि. ९) रोजी ७. ३५ वा. सुमा. चांदणी चौक, पुणे नाशिक हायवे, भोसरी येथील दिपक गंगावणे बिल्डींगमध्ये दुस-या मजल्यावरच्या AYURVEDA SPA सेंटर मधील रुम नं- २ मध्ये कारवाई केली.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार यांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिला आरोपी आणि प्रसाद दिलीप कलंगे (वय २६ वर्षे रा. कर्जत अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.