न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- आपआपसात संगनमत करून फिर्यादीस पनवेल महानगरपालिकेच्या भरारी पथकामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी डिपॉझीट म्हणुन फिर्यादीकडुन ५ लाख व इतर फी म्हणून ५० हजार असे एकुण ५.५० लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या नावचे पनवेल महानगरपालिकेचे बनावट आयडी कार्ड बनवुन दिले. फिर्यादीस कोणतीही नोकरी न देता दिलेल्या पैशापैकी फक्त १,५०,००० रुपये फिर्यादीस परत केले. शिल्लक राहिलेले पैसे परत न करता फिर्यादीची ४ लाखांची फसवणुक केली.
हा प्रकार (दि. ३/१२/२०२१ ते आजपर्यंत पंचवटी कॉलनी, ६/बी/२, तळेगाव दाभाडे) येथे घडला. फिर्यादी नागेश तानाजी जगताप (वय ३२ वर्षे, रा. पंचवटी कॉलनी, ६/बी/२ तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
आरोपी संदीप मारुती पांडव (वय ३० वर्ष रा. सेक्टर नं. ५, एल / १, रूनं. ४२, ऐरोली, नवी मुंबई), जगन्नाथन बालकृष्ण (वय ३७ वर्षे, रा. एम.एस/ आर. बी. १/११/२०, सेंट्रल रेल्वे कॉलनी, सेक्टर नं. २२, जुईनगर ठाणे), नितीन महादु वाघ (वय ३८ वर्ष, रा. मारुती धाम, रूनं. ३०२, प्लॉट नं. ५२, सेक्टर २०, उल्वे, नवी मुंबई) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.