न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरीतील डॉ. डी. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे एकदिवसीय डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठ सभागृहात होत आहे.
सोमवार (दि. १४) रोजी सकाळी ९ ते दु २ वा या वेळेत सकाळी ९ वाजता आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात होईल. यामध्ये रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी, हिमोग्लोबिन, बी पी, इसीजी तपासणी, (डायबेटिक न्यूरोपॅथी) पायांच्या नसांची तपासणी, (डायबेटिक रेटिनोपॅथी) डोळ्यांच्या नसांची तपासणी, भौतिकोपचार, व्यायाम आणि आहार मार्गदर्शन, मधुमेही रुग्णांच्या पायाची काळजी संबधी मार्गदर्शन (डायबेटीक फुट), मधुमेह तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल तसेच स्वादुपिंड प्रत्यारोपणाची माहिती देण्यात येईल.
सकाळी १०:३० वाजता जनजागृतीपर व्याख्यानमाला सत्राला सुरुवात होईल. व्याख्यानामध्ये मधुमेह उपचार या विषयी : वैद्यक आणि प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अनु गायकवाड, मधुमेहावर उपचार करण्यासाठी स्वादुपिंड प्रत्यारोपण: प्रसिद्ध ट्रान्सप्लांट सर्जन डॉ वृषाली पाटील, मधुमेह व त्याचे दुष्परिणाम- एंडोक्राइनोलॉजी तज्ज्ञ डॉ विनायक हराळे, मधुमेह म्हणजे काय? कश्यामुळे होतो? कारणे व प्रकार – फिजिशियन आणि प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ – डॉ विजयाश्री गोखले, आनंदाचे डोही आनंद तरंग.. ताणतणाव मुक्तीतून मधुमेह मुक्ती – सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक श्री अनंत राऊत, मधुमेहाची वास्तविकता – मेडिसिन विभाग प्रमुख – डॉ. शुभांगी कानिटकर या व्याख्यानमालेत सहभागी होत आहेत.
















