न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या आरोग्य सेवेकरीता शहरात एकुण ८ रुग्णालये व २९ दवाखाने सुरु केली आहेत. पालिकेचे कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे ७६० बेड्सचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परंतु, महापालिकेने कोविड महामारी दरम्यान नवीन रुग्णालयांची निर्मिती केल्याने वायसीएम रुग्णालयाचा ताण काहीसा कमी झाला आहे.
पालिकेने जुन २०२१ पासुन थेरगाव रुग्णालय (२०० बेड्स), ह.भ.प. कै.प्रभाकर मल्हारराव कुटे, आकुर्डी रुग्णालय (१३० बेड्स), नवीन जिजामाता रुग्णालय (१२० बेड्स) व नवीन भोसरी रुग्णालय (१०० बेड्स) कार्यान्वीत करण्यात आले आहेत. या रुग्णालयांमार्फत आरोग्य सेवा घेणा-या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे

या सेवांसोबतच या रुग्णालयांमध्ये रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, किरकोळ व मोठ्या शस्त्रक्रिया, विशेष व अतिविशेष बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग इत्यादी सेवा देखिल पुरविल्या जात आहेत. यामुळे कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील ताण कमी होत असताना दिसून येत आहे. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वैद्यकिय विभागाने केले आहे.
















