न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- कामावरुन सुटल्यानंतर फिर्यादी महिला गाडीवरुन घरी जात होत्या. दरम्यान पाठीमागुन काळ्या रंगाच्या अॅक्टिवा गाडीवरुन दोन अनोळखी इसम आले. आरोपींनी अचानक फिर्यादीच्या गाडीला पायाने लाथ मारून त्यांना खाली पाडले.
त्यावेळी फिर्यादी यांचा रस्त्यावर पडलेला १०००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल गाडीवरील आरोपींनी महिलेच्या मदतीने जबरदस्तीने हिसकावुन घेतला. नंतर आरोपी गाडीवर बसुन निघुन गेले. हा प्रकार (दि. ११) रोजी ६. ३० वा. चे सुमारास भोसरीतील पुणे-नाशिक हायवेवरील बंद असलेल्या रोझरी शाळेजवळ घडला.
याप्रकरणी महिला फिर्यादी (वय ३० वर्षे) यांनी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अॅक्टीव्हा गाडीवरील दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.