न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके तपासण्यासाठी लेखा विभागातील दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सहा महिन्यांसाठी मानधन तत्वावर नेमणूक करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त होताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके तपासणे गरजेचे असते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती होताना सेवा पुस्तकातील वेतन श्रेणी व वेतन निश्चिती तपासण्यासाठी शासन सेवेतील दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मानधन तत्वावर सहा महिने कालावधीसाठी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी महापालिका कर्मचारी महासंघाने केली होती.
त्यानुसार सेवानिवृत्त सहायक लेखाधिकारी सुभाष झनझने आणि गोविंद डोळे यांची सहा महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर नेमणूक करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.


















