न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- स्वतःचे लग्न होऊन दोन मुली झालेल्या असताना फिर्यादीचा मुलाशी प्रेमसंबंध प्रस्थापीत केले. त्यास लग्नासाठी तसेच फिर्यादीच्या मुलाने दुसऱ्या कोणाबरोबर लग्न केल्यास पोलिसात केस करण्याची धमकी दिली. घर चालविण्यासाठी वारंवार पैश्यांची मागणी करुन फिर्यादीच्या मुलाला मानसिक त्रास दिला.
आरोपी महिलेच्या छळाला कंटाळुन फिर्यादीच्या मुलाने (दि. १२) रोजी सकाळी ८.३० वा चे सुमारास शेतामधील झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विकास विलास माळवे (वय २७ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना मागील एक वर्षांपासुन ते दि. १२/११/२०२२ रोजी ८.३० वा पर्यंत आरोपी महिलेच्या राहत्या घरी व थेरगांवमध्ये घडला. ५० वर्षीय फिर्यादी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















