न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- नाव :- भिमाबाई अढाळ वय :- ७० वर्षे गावाचे नाव :- नानेकरवाडी, चाकण ह्या मागील २ वर्षापासुन पोटाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्या पोटात सतत दुखणे व खालेल्या अन्नाने त्यांना जेवल्यानंतर उलटी होण्याचा त्रास व तसेच वजन कमी होत होते. त्यांनी वेळोवेळी स्थानिक रुग्णालय दाखवले परंतु त्यांना त्रासातून सुटका मिळत नव्हती. पुण्यामध्ये त्यांना खासगी रुग्णालयामध्ये होणारे खर्च झेपणारे नव्हते, अश्या वेळेत त्यांच्या नातेवाईकांनी यशंवतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था विभागाच्या सर्जरी पथक प्रमुख डॉ. संतोष थोरात यांच्या पथकाला दाखवले, डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी करुन त्यांना ऍडमिट करुन घेतले व आवश्यक असणाऱ्या पोटाच्या सिटी स्कॅन, सोनोग्राफी, वेगवेगळे टयुमर मार्कर इत्यादी करुन झाल्यावर “रेट्रोपेरिटोनियल” सारकोमा (Retroperitoneal SARCOMA) चे निदान करण्यात आले.
रुग्णाचे वय व खालवत असलेली तब्येत पाहता त्यांना ऑपरेशन पुर्वी वेगवेगळी आरोग्य वर्धक औषधे चालू करण्यात आली. तसेच फिजीयोथेरोपी देण्यात आली. ऑपरेशन पुर्वी नातेवाईकांना आजारांची पूर्ण माहिती देऊन संभाव्य धोक्याबदल अवगत करण्यात आले व त्यांच्या परवानगीने पेंशटला सर्जरीकरिता पोस्ट करण्यात आले.
“सर्जरी दरम्यान पोटामध्ये दोन मोठ्या गाठी काढण्यात आल्या हया कॅन्सरच्या गाठी पोटामध्ये किडनी व मोठ्या आतडयाना प्रेशर देवून त्यांच्या कामात अडथळा करत होत्या ज्यामुळे डावी किडनीला सूज आली होती, तसेच कॅन्सर पोटाच्या मोठया रक्त वाहीन्यापर्यंत पोहचला होता” असे सर्जरी करणाऱ्या डॉ. संतोष थोरात हयानी स्पष्ट केले.
शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्ववत झाला असून दैनंदिन कार्य करु लागला आहे. सदर शस्त्रक्रियेकरिता डॉ. बालाजी धायगुडे प्राध्यापक व विभागप्रमुख सर्जरी, डॉ. आनंद झिंगाडे सहयोगी प्राध्यापक सर्जरी, डॉ. जितेंद्र वाघमारे सहयोगी प्राध्यापक भुलतज्ञ, हयांनी मार्गदर्शन केले. रुग्णाच्या नातेवाईकांनी पथकातील डॉ. मयुर बावीस्कर, डॉ. दिक्षा कटारे, डॉ. सौरभ सिंग, डॉ. अजिंक्य, डॉ. स्पर्श व सिस्टर इन्चार्ज ओटी स्वाती कुलकर्णी, सिस्टर ताटे, सिस्टर गिते इत्यादीचे आभार माणून कृतज्ञता व्यक्त केली.
“रेट्रोपेरीटोनियल सारकोमा” हे दुर्मिळ प्रकारचे कॅन्सर असतात, एकूण घन (Solid) अवयवांच्या १- २ टक्के इतक्या प्रमाणात आढळतात, पुर्णपणे (Complete) गाठ काढणे हाच त्यावर संपूर्ण इलाज असतो. – डॉ. संतोष थोरात, सहयोगी प्राध्यापक सर्जरी, वायसीएमएच पिंपरी…
“वायसीएमएचमध्ये पिजीआय च्या माध्यामातून व अध्यावत यंत्रणेच्या साहाय्याने जटील व पुर्वी न होणाऱ्या सर्जरी करणे शक्य होत आहे.” – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता पीजीआय वायसीएमएच पिंपरी…