न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२२) :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हिवाळी क्रिडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. १८) रोजी संपन्न झाला.
संस्थेचे संस्थापक ॲड. दिलीप निंबारकर, प्राथ. विद्या. मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर, राज्यस्तरीय खो-खो खेळाडू कु. रिया पवार, कु. दिप्ती बोराडे, विमल व-हाडी, साकोरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. स्पर्धा फलकाचे अनावरण करण्यात आले.
दोन दिवसीय स्पर्धेत सर्वप्रथम ९०० मी. धावणे या स्पर्धेला सुरुवात झाली. खो-खो, कबड्डी, लंगडी हे सांघिक तर १०० मी. धावणे, लांबउडी, गोळाफेक, इतर मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केलेले आहे.
शाळेचे क्रिडा विभागप्रमुख हनुमंत जगदाळे यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वाळुंज यांनी केले. विद्यालयातील शिक्षक धनंजय जगताप, गजानन शिंदे, विठा कोळेकर, भिमराव जगताप आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.