न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२२) :- खडकी येथील एस.व्ही एस. शाळेत डेंगी व मलेरियापासून बचावासाठी जनजागृती मोहीम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
डासांच्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारे आजार रोखण्यासाठी, हाऊस ऑफ डाबरच्या मॉस्किटो-रिपेलन्ट उत्पादन ’ओडोमॉस’ तर्फे पुण्यात डेंगीमुक्त भारत या मोहिमेचा प्रारंभ झाला.
या उपक्रमांतर्गत एस.व्ही एस. शाळेत डॉ. सतीश पाथकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मगर, राजेंद्र राममूर्ती, डाबर इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ मार्केटिंग व्यवस्थापक (होम केअर) संतोष जयस्वाल, ब्रँड मॅनेजर साक्षी प्रसाद आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील मुलांना डाबर तर्फे मोफत ओडोमॉस क्रीमचे वाटप करण्यात आले.