- पोलिसांकडून एकाला अटक; एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२२) :- घरात आरोपीने प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपीच्या घरावर छापा मारून कारवाई केली.
त्यात दोन लाख ११ हजार २९२ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि. १७) सायंकाळी संत तुकारामनगर पिंपरी येथे केली. पोलीस शिपाई यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बापू उर्फ बापूसाहेब महादेव जिंजरे (वय ३७. रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याला अटक केली आहे. त्याला गुटखा पुरविणारा दर्शन (पूर्ण नाव माहिती नाही रा. विजापूर, कर्नाटक) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















