न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२२) :- आई दुध डेअरी इथे फिर्यादी बसले होते. दरम्यान आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीवर कोयता उगारून दुकानातील काऊंन्टर, फ्रीज, बोर्ड यांची कोयता मारून तोडफोड केली. दुकानातील रोख रक्कम २ हजार ६०० रुपये काढून घेतली. तसेच कोयते व हॉकी स्टीकने दुकानाची तोडफोड केली.
यावेळी त्यांनी परिसरातील इतर दुकानंचीही अशीच तोडफोड केली. यावेळी हातात कोयते व हॉकी स्टीक फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि. १६) रात्री सदगुरुनगर येथील दत्तात्रय कॉम्प्लेक्स जवळ घडली.
याप्रकरणी प्रेशीत गणेश मोरे (वय २३ रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय विरेंद्र चव्हाण (वय १८ रा. भोसरी) याला अटक केली असून विजय चव्हाण, पंकज शर्मा, निलेश साळवे व इतर चार तेपाच जण यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.


















