न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ‘भारतरत्न’ इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिक्षिका सरला शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
सहशिक्षिका कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरला शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी ”वुमन ऑफ द मिलेनियम ” असा ‘किताब देण्यात आला.
सहशिक्षिका प्रज्ञा शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सहशिक्षका माधुरी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.