- उन्नती सोशल फाउंडेशन आणि Health MOBIS चा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :- उन्नती सोशल फाउंडेशन आणि Health MOBIS यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी (दि. १८) रोजी सामाजिक आरोग्य विकास कार्यक्रमांतर्गत पिंपळे सौदागरच्या सोसायटीतील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या आयोजक उन्नती सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे आणि दलजीत सिंह यांच्या हस्ते दीप दिप प्रज्वलन संपन्न झाले. यावेळी उद्योजक संजयशेठ भिसे, डॉ. कल्पना झा, जीशनु सौरभ, शुभम बडके, आकाश मेनन, अक्षय जोशी, शिवानी चेलमलवार, निखिल पाटील, उज्वल पाटील, कोकणे चौक ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भगवान झोपे, नवचैतन्य हास्य कल्बचे विलास नगरकर, आनंद हास्य कल्बचे राजेंद्रनाथ जयस्वाल, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी आणि सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.
सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, पिंपळे सौदागरच्या सर्व सोसायट्यांमध्ये ही आरोग्य तपासणी आठवड्याच्या प्रत्येक वीकेंडला सोसायटीच्या आवारात आयोजित केली जाणार आहे. नागरिकांनी आज आपली आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांचे धोके टाळले. या तपासणी मोहिमेत हिमोग्लोबिन, रक्तातील ग्लुकोज, कोलेस्टेरॉल (ब आणि क गटांसाठी), उंची, वजन, तापमान, Sp02, रक्तदाब याशिवाय डोळा आणि दंत तपासणीची देखील सोय उपलब्ध असणार आहे. अ,ब, क, ड, इ गटानुसार १५ वर्षांखालील मुलं, सोसायटीतील सुरक्षारक्षक, शारिक अपंगत्व आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी मोफत असून १५ ते ६० आणि ६० वर्षांपुढील नागरिकांना नाममात्र शुल्क देऊन या आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. या आरोग्य तपासणीचं निदान अगदी झटपट ३० तीस सेकंदात होणार आहे. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील व सोसायटीतील तसेच कॉलनीतील नागरिकांनी या आरोग्य तपासणी मोहिमेत सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कुंदाताई भिसे यांनी केले आहे.