न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :- १७५ ग्रॅम वजनाच्या ७ लाख ८७ हजार ५०० रुपयांच्या दोन सोन्याच्या लगडी फिर्यादी यांनी आरोपी याला दिल्या होत्या. त्या सोन्यातून आरोपीला नेकलेस, गंठण, अंगठ्या, चेन, झुमके तयार करण्यासाठी दिले होते.
मात्र, दागिने व सोने परत न करता सोन्याचा अपहार केला. ही घटना पिंपरीगाव येथील जयलक्ष्मी ज्वेलर्स येथे ६ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान घडला आहे.
हितेश रमेश दोशी (वय ४५ रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे. पोलिसांनी रॉनी ताजूद्दीन शेख (रा. पिंपरी) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.